Profile #1: Reserve Bank of India Archives

_dsc0017The Reserve Bank of India (RBI) established the Co-operative Bankers Training College (CBTC) at Pune on September 29, 1969 to train the higher level personnel of State, Central and Urban Co-operative Banks. It was renamed as the College of Agricultural Banking (CAB) on February 16, 1974. The RBI Archives was established on August 24, 1981 and acts as a nodal agency in respect of records management matters in RBI. RBI Archives is worth a visit for anybody interested in the history of such an important institution.

द रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्काइव्ह पुणे, पहिले रेकॉर्डस् अँड डोकमेंटशन सेंटर म्हणून ओळखले जात असे. याची स्थापना २४ ऑगस्ट १९८१ मध्ये करण्यात आली. याचे  दोन उद्दिष्ट्ये आहेत, जून्या कायमस्वरूपी दस्तऐवजांचा भरणा करणे व हे संग्रहालय संशोधनासाठी उपयुक्त ठरावे. डॉ. आर. एल. साहू प्रमुख संग्राहक/ उपमहाव्यवस्थापक असून आरबीआय अर्काइव्हचे प्रमुख आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून अर्केविस्ट, केमिस्ट आणि सहाय्यक अधिकारी व कर्मचारी वर्ग आहे.

आरबीआयएचे कार्य इतिहास विभाग, आर्थिक विभाग, संशोधन धोरण व आरबीआयच्या मुंबईच्या केंद्रीय कार्यालयांतर्गत चालते. कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चरल बँकिंग, पुणे आरबीआय यांचे आरबीआय संग्रहालयाला सुरुवातीपासूनच व्यवस्थापकीय सहकार्य मिळत आले आहे. एक संग्रहालय म्हणून कार्यरत राहण्यासाठी  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सर्व कायम रेकॉर्डस् चा वैज्ञानिक परिरक्षणाचा सर्वोत्तम दर्जा राखण्यात आला आहे. यात अगदी इलेकट्रोनिक स्वरूपातील रेकॉर्डस् चाही समावेश आहे. बँक ऑफ इंडियाचे महत्वपूर्ण रेकॉर्डस् संग्रहाचे स्रोत म्हणून तसेच  ते भविष्यात संशोधनाचे संदर्भ म्हणून जातं केले जात आहेत जेणेकरून सक्षम अनुभवांशी शिदोरी उपलब्ध होऊ शकेल.

कार्य :
  • केंद्रीय कार्यालयाच्या  संबंधित विभागाने १२ किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांपूर्वी बंद केलेली व ज्याला ऐतिहासिक किंवा कायदेशीर मूल्य आहे अशा निश्चित केलेल्या सध्याच्या नसलेल्या परंतु कायम रेकॉर्ड्सच्या पावत्या जपणे.
  • रेकॉर्डस्, छायाचित्र व चित्रांचे वैज्ञानिक जातन करणे. त्यांना किटाक्यांपासून वाचविणे, विविध कार्यालये, विभागातून मिळालेल्या रेकॉर्डस् ना व्हॅक्युम खोलीच्या जंतू नाशक आणणे हे केले जाते. त्याशिवाय ठिसूळ आणि नाजूक रेकॉर्डस् शास्त्रीय पद्धतीने ऍसिटेट फॉईल, टिशू पेपर आणि हॅन्डमेड पेपरने दुरुस्त केले जातात.
  • बँकेच्या सर्व विभागांना तसेच कार्यालयांना आणि बाहेरील संस्थांना व संशोधकांना भरपाई सेवा व संशोधन  पुरविणे.
  • रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सर्व प्रकाशनांच्या जसे पुस्तके, रिपोर्ट्स, जर्नल्स, नियमावली, माहितीपत्रके इ. च्या ३ प्रति संग्रहालयात संग्रहित करण्यात येतात.
  • रेकॉर्डस् आणि प्रकाशनांनुसार निर्देशांक सूची करून संदर्भ मध्येम तयार करणे.
  • बँकेच्या रेकॉर्डस् व्यवस्थापनाच्या दृष्टीने केंद्रीय संस्थाम्हणून काम करणे आणि बँकेच्या  सर्व विभाग व कार्यालयांमध्ये संग्रहित व रेकॉर्ड व्यवस्थापन धोरणाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे.
  • तोंडी इतिहास रेकॉर्डिंग्सचे जातं करणे.
  • बँकेच्या इतिहासाशी संबंधित विषयांवर आधारित प्रदर्शने आयोजित करणे.
  •  डिजिटायझेशन व मायक्रोफिल्मईंग करणे.
 संस्थेत एकूण २६००० फाइल्स, १२००० रजिस्टर्स, ७२०० प्रकाशाने, १५२७ प्रसार माध्यमात छापून  बातम्यांचे संकलन, ५००० छायाचित्रे, १४०० मायक्रोफिल्मईंग रोल्स, १००० इलेकट्रोनिक रेकॉर्डस् आहेत. आरबीआय संग्रहण संग्रहालयाचे उदघाटन १ जून २०१० ला झाले. मुझियमसाठी घेण्यात आलेले डॉक्युमेंट्स अर्कायव्हल मधून आरबीआयच्या इतिहासाच्या  थीमशी संबंधित निवडून घेण्यात आले.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s