Profile #2 : Ayurveda Rasashala

ayurved-rasashala

In Sanskrit, Ayurveda means “The Science of Life.” Join us for an insightful tour of the Ayurved Rasashala. Ayurveda Rasashala was established in 1935 to impart practical knowledge of manufacturing Ayurvedic drugs to Ayurveda Graduate students. During the visit, learn about the benefits of Ayurveda and get a chance to tour their facility and see how Ayurvedic medicines are manufactured from raw materials to the final product.

Read more:- आयुर्वेद रसशाळा म्हणजे काय?

आयुर्वेदिक औषधे तयार करणारी पुण्यातील एक संस्था अशी या संस्थेची ओळख पुरेशी होणार नाही. या संस्थेचे वेगळेपण लक्षात येण्यासाठी थोडासाज्या काळात हि संस्था उभी राहिली त्या काळाचा मागोवा घ्यावा लागेल. एका बाजूस आधुनिक वैद्यकीय शिक्षणात विविध प्रयोग होत होते, नवीन प्रतिबंधक लसी शोधल्या जात होत्या,शवविच्छेदन पद्धतीही चांगली विकसितझाली होती. आधुनिक वैद्यकशास्त्र पुराव्यांच्या आधारावर आपली सिद्धता पटवून देत असताना, अनुभवसिद्ध असलेले आपले  आयुर्वेदाचे ज्ञान लुप्त होते की काय अशी चिंता आयुर्वेदाचा उपयोग करणाऱ्या वैद्यांना वाटू लागली.

मधल्या जवळपास शंभर वर्षात  पूर्वापार चालतआलेल्या औषधांव्यतिरिक्त  आयुर्वेदात फारशी प्रगतीच होऊ शकली नव्हती. आयुर्वेदाचा अभ्यास शास्त्रशुद्ध पध्दतीने पुन्हा प्रचलित व्हावा याच हेतूने राष्ट्रीय शिक्षण मंडळ या ट्रस्टचा एक भाग असलेले टिळक आयुर्वेद महाविद्यालय १९३३ मध्ये सुरु झाले.या महाविद्यालयाला संलग्न असलेले शेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदीय रुग्णालयही नंतर स्थापन करण्यात आले.आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात शास्त्रशुद्ध औषधनिर्माण हा विषय असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अशी प्रयोगशाळा उपलब्ध असणे  गरजेचे होते.तसेच रुग्णांसाठीलागणाऱ्या आयुर्वेदिक औषधांची गरज मोठी होती,  ह्या दोन्ही गरजा पूर्ण करण्याचे महत्वपूर्ण काम १९३५ मध्ये सुरु झालेल्या आयुर्वेद रसशाळेने केले.

रसशाळेच्या मुख्य प्रवर्तकांपैकी एक असलेले वैद्यभा. वि. उर्फ मामा गोखले यांनी त्यांच्या अनुभवातून विविध आयुर्वेदिक कल्पांची निर्मिती केली.आयुर्वेद रस शाळेची प्रोप्रायटर म्हणून मामा गोखले  यांना मान्यता मिळाली. त्यांच्यासह नंतरही अनेक नामांकित वैद्यांनी रसशाळेच्या संशोधन कार्यात आपले मोलाचे योगदान दिले. आधुनिक वैद्यकशास्त्र पुराव्यांच्या आधारावर आपली सिद्धता पटवून देत आणि अनुभवसिद्ध आयुर्वेदाच्या ज्ञानाचे पुनर्ज्जीवन करत   ‘आयुर्वेद रसशाळा’ ठामपणे उभी राहिली, रुजली आणि वाढलीही. औषधांची किंमत वाढली तरी चालेल, पण त्याचे मूळ द्रव्य, औषधप्रक्रिया आणि अंतिम उत्पादन याच्या  शास्त्रीय  गुणवत्तेत कुठेही तडजोड करायची  नाही, हे ब्रीद रसशाळेने कायम पाळले आहे. औषधांच्या उत्पादन प्रक्रियेत कालानुरूप बदल करणे, आवश्यक त्या ठिकाणी यंत्रांचाच वापर करणे, हे ही रसशाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. जाहिरात करण्यापेक्षा वैद्यांपर्यंत व आयुर्वेदिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे, त्यांना औषधांबाबत माहिती देणे, आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील रुग्णांना  माफक दरात औषधे पुरवणे या गोष्टी त्यांना अधिक महत्वाच्या वाटतात.

आयुर्वेद रसशाळेच्या आयुर्वेदातील महत्वपूर्ण योगदानाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर ही घेतली गेली आहे. या क्षेत्रांत मानाची समजली जाणारी  आर्क ऑफ यूरोप गोल्डन स्टार, आर्क ऑफ यूरोप डायमंड स्टार,प्लॅटिनम स्टार ऑफ माद्रिद, आयसेन मेक्सिको अवार्ड अशी विविध पारितोषिके रसशाळेने वेळोवेळी पटकावली आहेत.

आयुर्वेदिक औषधांच्या सततच्या जाहिरातींच्या माऱ्यातही पुण्याचा ब्रँड असलेल्या  रसशाळेने गुणवत्तेच्या आधारावर  स्वतःचे असे अढळ स्थान मिळवले आहे. प्रशम, रसदन्ती, रसगंधा, सूक्ष्मत्रिफळा, कुंभजतु असे रसशाळेचे विविध कल्प मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. शतावरी कल्प, कनोजचा प्रवाळयुक्त गुलकंद, वारुणादि क्वाथ, मधुमेहासाठी वापरले जाणारे आसनाद हेदेखील लोकप्रियआहेत.

 

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s