Profile #3 : JeevitNadi

final-jeevitnadiJeevitNadi is an ngo dedicated to rejuvenation of Mutha River in Pune. Pune’s history begins at the banks of the same Mutha that was recently declared as ecologically dead. The organization aims to sensitize people by re-connecting them to the river. Educating people to lead ecologically sensitive lifestyles along with garnering public support for the river rejuvenation project are some of the objectives of the organization. This Festival JeevitNadi in collaboration with Janwani is organizing a River Heritage Cycle Ride!

जीवितानदी ही अशी एक संस्था आहे, ज्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारे लोक केवळ पर्यावरण संरक्षणाच्या हेतूने एकत्र आले आहेत. नद्यांचे पुनरुज्जीवनाचे उद्दिष्ट ठेऊन ही संस्था कार्य करते. मुठा नदीचे पुनरुज्जीवन हा दृष्टीकोन ठेऊन लोकांचा सहभाग वाढविणे, जनजागृती करणे, टॉक्सिक फ्री जीवनशैलीचे महत्व पटवत प्रदूषणमुक्त करणे, नदीच्या पुनरुज्जीवनासाठी शास्त्रीय व पर्यावरणीय योजना विकसित करणे आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या सगळ्या गोष्टी शाश्वत ठेवणे हा हेतू आहे. या संस्थेतील बहुतांश लोक हे प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ प्रकाश गोळे यांचे विद्यार्थी आहेत. गेली २ वर्ष ते कार्यक्रमांविषयी चर्चा व योजना करण्यासाठी  नियमितरित्या भेटत आहेत. जीवितनदी मुळा -मुठा ही खरी गुरुदक्षिणा असेल असे त्यांना वाटते.

जीवितनदीची टीम जेंव्हा मुठेच्या उगमावर गेली त्यावेळी मुठा कोणकोणत्या बदलांना तोंड देत गेली ते समजले. एकेकाळी शहरातून सुंदर खळखळत वाहणारी नदी आता कचरा व गाळ वाहणारा नाला झाली आहे. नद्या आता नैसर्गिक जिवंत स्रोत राहिलेला नसून, केवळ पाण्याचा घटक आहे, ज्यात मानवी, प्रदूषण, अनियोजित शहरांचे अतिक्रमण आहे. आपली पाण्याची गरज प्रामुख्याने चार धारणांद्वारे पूर्ण होते. ज्यातील दोन मुठेवर आणि दोन आंबी व मोशी हे त्याच्या उपनद्यांवर आहेत. नद्यांवर थेट अवलंबून राहणे कमी झाल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

2025

आपण वापरलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे सांडपाण्यात रूपांतर होते. शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याच्या तुलनेत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची एकूण क्षमता कमी आहे. टूथपेस्ट, शाम्पू, साबण यातील रासायनिक टकांद्वारे अशुद्ध घटक रोजच नदीत जातात. ज्यातून सांडपाणी तयार होते. कोणतेही शुद्धीकरण प्रकल्प पाण्यात विरघळलेले हे रासायनिक घटक काढून टाकू  नसतात. ते राहतात, आणि प्रदूषण वाढवतात.

जेव्हाही नदी प्रदूषणाचा मुद्दा समोर येतो आपण सरळ कारखान्यांकडे बोट दाखवून मोकळे होतो. परंतु मुठेकडे नीट लक्षदेउं बघितलेकी समजते की तेथील ७० टक्के प्रदूषण हे स्थानिक आहे. कारखाने आणि शेती यांचा मिळून उर्वरित ३० टक्के सहभाग असल्याचे दिसते. याचाच अर्थ आपण नद्या  ७० टक्के शुद्ध ठेऊ शकतो. पण कसे? या उत्तराच्या शोधात अनेक तज्ज्ञांशी चर्चा झाल्या, अनेक विचारविनिमय झाले. परिणामतः जीवितनदी समोर दुहेरी उद्दिष्टये आले. भविष्यतील विकासात्मक योजनेसाठी सखोल अभ्यास व नदीच्या सद्य स्थितीचे मूल्यांकन आणि टॉक्सिन फ्री जीवनशैलीचा प्रचार व धोरण.

त्यानंतर आपल्यातील प्रत्येकजण यासाठी काय करू शकतो याचा विचार सुरु झाला. टॉक्सिनफ्री जीवनशैलीत घटक रसायनांच्या ऐवजी जी रसायने आपल्यला व पर्यावरणाला धोकादायक नाहीत त्यांचा वापर करावा. हे बोलणे प्रत्यक्ष कृती पेक्षा सोपे असले तरी या द्वारे बराच बदल घडू शकेल. प्रदूषण  उपचार करण्यापेक्षा मुळातीलच प्रदूषण कमी करणे हा शाश्वत उपाय आहे. लोकांना यात मदत करण्यासाठी जीवितनदीच्या टीमने काही उत्पादने बनविलेली आहेत. बदल कायम सामान्य जनताच घडवून आणू शकते असा त्यांचा विश्वास आहे.

नागरिकांच्या सहभागाने ते मुठा नदी उत्सव साजरा करतात. जास्तीत जास्त लोक यात सहभागी होतील या दृष्टीनेच कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुण्याच्या अस्तित्वाचे मुख्य कारण ही मुठा नदी आहे. भारतातील अन्य अन्य शहरांप्रमाणेच पुण्यानेही आपली नदीशी असलेली नाळ गमावली आहे. त्यामुळे नदी म्हणजे साहजिकच कचरा आणि सांडपाणी वाहणारा घटक झाला आहे.

लोक सहभागाशिवाय कोणताही नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम यशस्वी व शाश्वत होऊ शकत नाही.

यामुळेच मुठा नदी उत्सव हा लोकांना नदीच्या जवळ आणण्याचा आमचा एक प्रयत्न आहे, ज्यातून नदी आणि नागरीकाकांचा तुटलेला संबंध पुन्हा स्थापित करण्यासाठी प्रयत्न केला जातो असे ते सांगतात.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s